Oferta de
Pravas Bakiy
Mais ofertas de Generico
R$ 113,00
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.
Mais informações do Produto
Pravas Bakiy
पुस्तकाबद्दलची माहिती
'प्रवास बाकीय...' ही प्रियांका डहाळे या अष्टपैलू तरुणीची कादंबरी.
प्रियांका डहाळे ही पेशाने पत्रकार होती. 'अनावृत्त रेषा' हा तिचा पहिला कवितासंग्रह आणि पहिलेच पुस्तक. त्यानंतर आलेले तिचे हे दुसरे आणि शेवटचे पुस्तक. कारण तिचे अपघाती निधन झाले आणि तिचा लेखनप्रवास मात्र अधुराच राहिला. अतिशय हरहुन्नरी असलेली प्रियांका डहाळे हिची शोधक-चिकित्सक-निरीक्षक वृत्ती आणि दृष्टी तिच्या या कादंबरीतूनही प्रत्ययास येते. या कादंबरीतील मुख्य नायिकाही पेशाने पत्रकारच आहे. आत्मिक आणि देहिक पातळीवरील मानवाचे स्थलांतर... नातेसंबंधातील स्थलांतर... भावभावनांच्या पातळीवरील स्थलांतर कसे घडते? त्याचे काय परिणाम घडतात? परिणामांचे भोग कसे भोगावे लागतात? याचा तिच्या पत्रकार मनाने घेतलेला शोध आपल्यालाही अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.