Oferta de
Pravas Sampat Chalalay: KavitaSangrah (Marathi Edition)
Mais ofertas de Generico
por
Sob Consulta
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.
Mais informações da Oferta
Pravas Sampat Chalalay: KavitaSangrah (Marathi Edition)
ओळख माणसाचा जन्म झाला की त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो आणि मरणाच्या वेळी त्याचा प्रवास थांबतो. जन्म आणि मरण ह्यांच्यामध्ये तो जो काही आयुष्य जगतो, हा त्याचा प्रवास असतो. ह्या प्रवासात प्रत्येक क्षणाने त्याचा प्रवास जन्मापासून दूर जात असतो आणि तेवढाच तो मरणाच्या जवळ पोहोचत असतो. अशा ह्या जन्मापासूनच्या ते मरणापर्यंतच्या प्रवासात तो विविधे ठिकाणी आपले तळे ठोकून बसतो. कधी तो कुटुंब नावाचे निवासस्थान बनवतो; तर कधी विविध नाती बनवून तो स्वत:चा विसावा घालवतो. असा ह्या त्याचा प्रवास क्षणाक्षणाने संपत चाललेला असतो.हा 'संपत चाललेला प्रवास' माणसाला खूप काही अनुभव देतो. काही अनुभव त्याच्या मनाला सुखावा देतात तर काही त्याच्या मनाला दु:ख देतात. हे सुख-दु:खाचे क्षण जगता-जगता तो स्वत: घडत असतो. स्वत:चा प्रवास एकट्याने चालत असतो. पण ह्या प्रवासात त्याला त्याचासोबती मिळतो. ह्या सोबत्यासोबत तो प्रवासाचे सुंदर जग न्ह्याहाळून घेतो. ह्या प्रवासाचा मनसोक्त आनंद उधळून घेतो. प्रवासाचा खरा खुरा आनंद जगून घेतो.
अशा ह्या संपत चाललेल्या प्रवासात तो काही चुका करतो. चुका करून प्रायश्चित घेतो. कधी कधी त्याला माफ केले जाते तर कधी कधी त्याला कायमसाठी चुकीचे ओझे घेऊन वाहावे लागते. अशा वातावरणात त्याचा प्रवास थोडासा थकवा आणू लागतो आणि त्याला निराशा येते. पण अशा निराशाच्या वेळी तो स्वत:ची वाट शोधतो आणि प्रवास पुन्हा जोमाने सुरू करतो. आणि तो प्रवासाचे बरे-वाईट प्रसंग स्वत:सोबत घेऊन मरणाच्या भेटीला जातो. प्रवासाच्या अंताला येऊन पोहोचतो.
आणि नेमक्या ह्याच क्षणी त्याला कळून येते की, ह्या प्रवासात तो स्वत:साठी जगायचंच विसरून गेला. म्हणून ह्या संपत चाललेल्या प्रवासात माणसाने स्वत:साठीही जगून घ्यावे आणि क्षणाक्षणाने 'प्रवास संपत चाललाय' हे ध्यानात ठेवून प्रवासाचे क्षण आनंदाने जगावे. मनसोक्त जगावे
Mais sobre este produto
Pravas Sampat Chalalay: KavitaSangrah (Marathi Edition)
Sob Consulta
* Confira sempre o valor atualizado antes de efetuar a compra.